कॉलेज संपलं, आता तुझं 'शिक्षण' सुरु होईल..
आता भेटतील तुला खरे प्रश्न, उत्तरं नसलेले..
आणि आता विसरायचं बरं का..
पैकीच्या पैकी मार्क वगैरे..
पुस्तकात उत्तरं शोधायची तुझी सवयही मोडायला हवी..
मोडेलच आपोआप..
पुन्हा पुन्हा पुस्तकात उत्तरं शोधशील.. सवयीप्रमाणे,
आणि ती बेटी सापडायची नाहीत..
हळू हळू होईल सवय, काठावर पास व्हायची
कधी नापास होण्याचा अनुभवही घ्यावा लागेल..
मान्य आहे, तू हिंदी सिनेमातल्या हिरोसारखा
नेहेमी फर्स्ट क्लास फर्स्ट वगैरे आलास.. पण..
आता विसरायचं बरं का ..
कॉलेज संपलं, आता तुझं 'शिक्षण' सुरु होईल..
आता भेटतील तुला खरेखुरे प्रश्न, उत्तरं नसलेले..
Thursday, October 22, 2009
Subscribe to:
Posts (Atom)